You are currently viewing विद्यार्थ्यांसाठी एसटी वेळेत बदल करा; मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांचे वेंगुर्ले आगाराला निवेदन

विद्यार्थ्यांसाठी एसटी वेळेत बदल करा; मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांचे वेंगुर्ले आगाराला निवेदन

सावंतवाडी

मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी शाळेतील विद्यार्थ्याची परवड होत असल्याने एसटी फेरांच्या वेळेत बदल करावा अशा मागणीचे पत्र वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

वेंगुर्ला आगाराच्या बांदा ते वेंगुर्ला सकाळी ९.०० वाजता,तर दुपारी ०३.१५ वाजता बांदा ते वेंगुर्ला अशा दोन बस बांदा येथून वरील वेळेत सुटतात.या दोन्ही बस शाळा भरण्याच्या आणि शाळा सुटण्याच्या वेळेपेक्षा लवकर सुटत असल्याने विद्यार्थ्यांची परवड होत आहे.यामुळे या दोन्ही बस फेऱ्या मुख्य ठिकाणाहून म्हणजे बांद्या एस टी आगारातून १५ ते २० मिनिटांनी उशिराने सोडल्यास याचा फायदा शाळेतील पाडलोस,आरोस, दांडेली,कोंडुरे,मळेवाड, आजगाव,भोम या ठिकाणच्या विद्यार्थ्याना होणार आहे. तरी दोन्ही बस फेऱ्यांचा वेळ वाढवून बदल बस सुटण्याच्या वेळेत बदल करावा अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा