– पोलिस उपअधीक्षक दिपक कांबळे
सिंधुदुर्गनगरी
शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूद्ध नागरीकांनी निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक दिपक कांबळे यांनी केले.
‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया’ ही संकल्पना घेवून दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आपले कोणतेही काम होणार नाही, अशी मनामध्ये भिती न बाळगता या संबंधिच्या काही तक्रारी असतील तर त्या तात्काळ द्याव्यात. शासकीय काम नियमानुसार होत असेल तर ते करून देण्याची जबाबदारी लाच लुचपत विभागाची आहे. शासकीय काम करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी, लोकसेवक लाच मागणी करत असेल तर नागरिकांनी निर्धास्तपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 9890079208, 02362-222289 आणि 9930997700 या व्हॉट्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कांबळे यांनी केले आहे.