२५ किमीचे अंतर आ. वैभव नाईक यांनी सहजरित्या केले पार
कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लबचे आयोजन
सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने रविवारी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली. मॅरेथॉन’ला सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४०० सायकलपट्टू यात सहभागी झाले होते.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे सलग तिसऱ्या वर्षी या मरेथॉनमध्ये सहभागी झाले. कुडाळ एमआयडीसी ते वेंगुर्ले मठ तिठा पुन्हा रिटर्न असे २५ किमीचे अंतर आ. वैभव नाईक सहजरित्या पार करीत आपला फिटनेस दाखवून दिला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी तसेच अमेरिका येथील सीरॅक व्ही या तरुणानेही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
२५, ५० आणि १०० किमी. अशा तीन गटात ही मॅरेथॉन झाली. कुडाळ- एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणावरून या मॅरेथॉनला रविवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मॅरेथॉनचे उद्घाटन आमदार वैभव नाईक व सीईओ प्रजीत नायर यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी देऊन करण्यात आले, तर १०० किमी. मॅरेथॉनचाही शुभारंभ याच द्वयींच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, प्रायोजक सिंधुदुर्ग जिल्हा बँक,स्टेट बँक, प्रायोजक टायटनचे शक्ती देसाई,सावू फूडचे सागर शिंदे, जे. के. सिमेंटचे राजू पवार व रोहन धुरी, कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा पोलीस प्रतिनिधी म्हणून सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षक सिंधुदुर्ग सुरेश राठोड, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अमोल शिंदे, इव्हेन्ट चेअरमन शिवप्रसाद राणे, कुडाळ सायकलिंग क्लबचें अध्यक्ष रुपेश तेली, मालवण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष रामचंद्र चव्हाण, कणकवली सायकलिंग क्लबचे अध्यक्ष मकरंद वायंगणकर, कट्टा सायकलिंग क्लबचे अध्यक्ष नीलेश झाटये, देवगड सायकलिंग क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, वेंगुर्ले सायकलिंग क्लबचे अध्यक्ष डॉ. मणचेकर, सावंतवाडी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष नाझीर चाचा, रेन्बो रायडरचे अध्यक्ष बापू परब, विशाल
फाऊंडेशनचे विशाल परब, रोटरी क्लबचे कुडाळचे राजन बोभाटे, सिंधुदुर्ग जिल्हा टेम्पो चालक-मालक संघटना अध्यक्ष पांडुरंग कांदळगावकर,लायन्स क्लब अध्यक्ष ॲङ समीर कुलकर्णी, रोटरी क्लब कुडाळचे सचिव डॉ. संजय केसरे, युथ होस्टेजचे अध्यक्ष रामचंद्र केणी व मधुकर थोरात (दोन्ही पुणे), राजेंद्र केसरकर तसेच असोसिएशनचे व सायकलिंग क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये कनक रायडर (कणकवली) चे २५, पणजी-गोवा सायकलिंग क्लबचे १५, रत्नागिरी सायकलिंग क्लब-२५, कोल्हापूर सायकलिंग क्लबचे १५, सावंतवाडी सायकलिंग क्लबचे १५, शिरोडा सायकलिंग क्लबचे १०, रेन्बो रायडरचे ६,कुडाळ सायकलिंग क्लबचे ३० यांच्यासह जिल्हाभरातील मिळून सुमारे ४०० सायकलपटूंनी ही मॅरेथॉन यशस्वी केली.सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले.
*असा राहिला मार्ग*
२५ किमी. मॅरेथॉन कुडाळ-एमआयडीसी ते वेंगुर्ले-मठ तिठा व रिटर्न, ५० किमी. मॅरेथॉन कुडाळ- एमआयडीसी ते वेंगुर्ले व रिर्टन, तर १०० किमी. मॅरेथॉन कुडाळ-एमआयडीसी ते वेंगुर्ले बंदर तेथून केळुस, म्हापण, चिपी विमानतळमार्गे मालवण-चौके, धामापूर-काळसे-नेरुरपार-कुडाळ असा मार्ग होता. रत्नागिरी येथील ६२ वर्षीय मृत्युंजय धार यांचा सहभाग तरुणांना प्रेरणा देणारा ठरला. त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. मात्र त्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत ती यशस्वीरित्या पूर्ण केली. सूत्रसंचालन कुडाळ सायकलिंग क्लबचे सदस्य सचिन मदने यांनी केले.