मालवण
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुमारे १० लाख रुपयांच्या पारितोषिकेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेच्या तारखेत बदल झाला आहे. आता ही स्पर्धा टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे १५ ते १९ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली. शहरातील दांडी येथे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्यानेच या स्पर्धेच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक स्पर्धा ८ ते १२ मार्च या काळात आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र या काळात होणारा होळीचा सण दांडी येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याने स्थानिकांच्या विनंतीनुसार या स्पर्धेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्या आला आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेत ३२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख ४८ रुपये, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार ४८ रुपये व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके दिली जाणार आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन होणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी स्पर्धा अधिकारी बंटी केरकर मोबा. ९६३७२३२१९२ यांसह शाम वाक्कर, सुनील मालवणकर, किरण वाळके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.