कपिलदेव यांना फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज…

कपिलदेव यांना फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज…

 

दिल्ली :

 

भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिलदेव यांना रविवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

 

कपिलदेव यांना रविवारी दुपारी घरी पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच ते त्यांचे दैनंदिन काम करू शकतील. डॉ. अतुल माथूर यांचा माहितीनुसार वैद्यकीय सल्ला कपिलदेव घेतील. डॉ. माथूर यांनीच कपिलदेव यांच्यावर अँजिओप्लास्टी केली आहे,’’ असे फोर्टिस रुग्णालयाने स्पष्ट केले.

 

कपिलदेव यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजताच ते बरे व्हावेत, यासाठी क्रिकेट जगतातून मोठय़ा प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा