You are currently viewing आज सेनेत होणार भाजप व शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश..

आज सेनेत होणार भाजप व शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश..

सावंतवाडी :

 

राज्यभरात शिवसेनेत आऊटगोईंग सुरू असताना सावंतवाडीत निरवडे गावात मात्र आज मोठा पक्षप्रवेश घेण्यात येणार आहे. यावेळी भाजपसह शिंदे गटातील प्रमुख व माजी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात मोठा पेंडॉल उभारण्यात आला आहे. या मेळाव्यात सुमारे ७०० हून अधिक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.

या मेळाव्याला सायंकाळी ५.३० च्या सुमारास सुरुवात होणार असून खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गावातील आजी-माजी पदाधिकारी प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा