वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची मासिक सभा रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. तालुका कार्यालयात होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते व महिला जिल्हा संघटीका जान्हवी सावंत आदी उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.