मालवण
रुपेश जगन्नाथ हरवळकर (40 रा. उरसा कारवार) याने बलाव्यातील रोहिल्याच्या सहाय्याने गळफास घेऊन मालवण समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत हरवळकर याचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे मच्छीमारांच्या ही घटना निदर्शनास आली.
मालवण येथील मनीषा जाधव यांच्या बल्यावावर रुपेश जगन्नाथ हरवळकर हा खलाशी म्हणून कामास होता. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बल्याव मालवण समुद्रात मासेमारीस गेले होते. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रुपेश हरवळकर याने रोहिल्याला गळफास घेऊन नांगरासह समुद्रात उडी मारल्याची घटना घडली. त्यानंतर बोटीवरील खलाशांनी रुपेश हरवळकर याला समुद्रातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. हरवळकर याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले होते.