*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*
*आपणांस माहीत आहे का.. ??*
आपण वारंवार वृतमानपत्रात. टिव्ही. वर काही मातंबर नेते खासदार आमदार विविध खात्यांचे मंत्री समाजातील काही नामांकित व्यक्ती. आणि देवस्थान पुजारी बाबा हे आणि आत्ता नवीन फंडा आला आहे तो म्हणजे मुलूख मैदानी तोफ. स्टार प्रचारक. अशी लोक विविध राजकीय पक्षांनी नेमले आहेत. हे सर्वजण समाजात तेढ. तरुण वर्गात तेढ. महिला मध्ये तेढ. विविध जाती जमाती मध्ये तेढ. सभेला लोक यावी म्हणून. धार्मिक तेढ. समाजाच्या विचार आचार यावर वादग्रस्त वक्तव्य. निवडणूकीत मत मिळविण्यासाठी. अशा विविध ठिकाणी आज सर्रास लोकांच्यात तेढ निर्माण व्हावा यासाठी वादग्रस्त वक्तव्य करताना आपणांस दिसतात. कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. उदा. त्या पेटीत काय आहे ते सांग. कोणी कोणास हसू नये. आज आपणं काही लोक जे आपणच आपल्या मताने निवडून दिले तेच आज शाब्दिक बाण आपल्यावर चालवून आपल्या समाजात . भाऊ भाऊ. मित्र मित्र. सगेसोयरे. घरातच नवरा बायको. यामध्ये सुध्दा खास यांचाच उद्देश साध्य करण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करतांना आपणांस दिसतात. आज सत्तेत एक आहे. तो विरोधकांच्या आडाने वादग्रस्त वक्तव्य करतो. आणि समाजातील काही टवाळी त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्य यांचे भांडवल करून माकडाप्रमाणे नाचताना आपणं पाहतो म्हंजे कोण काय म्हणेल कुणाला म्हणले याकडे आपल लक्ष नसतं. कारणं आपणं बिनडोक आहोत हे या वादग्रस्त वक्तव्य करणारे यांनी ओळखले आहे.
संविधान हे सर्वांना समान स्वातंत्र्य सांगत बोलण्याचे स्वातंत्र्य. फिरण्याचे स्वातंत्र्य. लिखाण स्वातंत्र्य. पण यासाठी सुध्दा काही कायदे नियम अटी शर्ती घालून दिल्या आहेत. कोणत्या गुन्हा केला तर त्यासाठी काय शिक्षा तरतूद आहे हे सुद्धा लिखाण करून ठेवलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे यांच्यासाठी पोलिस प्रशासन . जिल्हाधिकारी. तहसिलदार. एसपी. डिआयजी. हे खरोखरच काही ठोस पाऊल उचलत नाहीत म्हंजे प्रशासन सुध्दा आज नेते खासदार आमदार मंत्री सरपंच नगरसेवक. यांनी अशा वादग्रस्त वक्तव्य करणारे यांना पाठीशी घालत आहेत. असं चित्र आज चोहीकडे दिसत आहे.
वक्तव्य करायचं असेल तर आज तरुणाई बेरोजगारी या संकटाने ग्रस्त आहे त्यांच कुणाला काय पडलं नाही. आज सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक एकीकडे हाताला रोजगार नाही आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू तेल डीझेल पेट्रोल गॅस याची महागाई आज आभाळाला ठेपली आहे.यासाठी कोणीही काहीही करत नाही करतात ते फक्त वादग्रस्त वक्तव्य आणि लोकांचे लक्ष विभागले जाते म्हंजे लोकं वादग्रस्त वक्तव्य ध्यानात ठेवणारा महागाई बेरोजगारी नाही. नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत व अन्य विभाग विविध करांच्या नावांवर विविध करांच्या नावाखाली लोकांना लुटत आहेत त्यावेळी कोणी काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. आज महिला कामांवर सुरक्षित नाहीत. मुली मुल शाळेत बसस्टॉपवर. बाजार. माॅल अशा ठिकाणी सुरक्षित नाहीत यासाठी काही करायची गरज आहे पण आपण करतो ते फक्त वादग्रस्त वक्तव्य आणि जनतेचे लक्ष भटकविणयाचे काम करतो . मतांसाठी गुंडगिरी गुन्हेगारी.दहशतवादी.टोळीयुधद.अपहरण. बलात्कार. धमकी. मारामाऱ्या. कायमचं होत आहेत त्यामुळे जनता मतदान करायला सुध्दा धाडस करत नाही.
शासकीय निमशासकीय कार्यालयासमोर आज सर्वसामान्य लोक आपल्यावरील विविध अन्याय अत्याचार याना न्याय मिळावा यासाठी आंदोलन उपोषण रस्ता रोको करत आहेत. त्यांना कोणीही न्याय देत नाही. धरणग्रस्त. प्रकल्पग्रस्त. अवेळी अवकाळी पाऊसामुळे पिक नुकसान. पूरामुळे घर जमीन नुकसान. रोगराई यामुळे लोकांचे नुकसान. घरकुल घोटाळा. पाणीपुरवठा घोटाळा. बांधकाम कामगार बोगस नोंदणी घोटाळा. विविध ग्रामीण शहरी कल्याणकारी योजना घोटाळा.विविध क्षेत्रातील भरती घोटाळा. पेन्शन घोटाळा. रेशनकार्ड रेशन वाटप घोटाळा. भुसंपादन घोटाळा. बचतगट घोटाळा. महसूल घोटाळा. अवैध जमीन अधिग्रहण. रस्ता गटर कामांत घोटाळा. एसटी कामगार घोटाळा. अशा विविध ठिकाणी लाखो करोडो रुपयांची अफरातफर होतें त्यावेळी एकही नेता आमदार खासदार मंत्री पक्षाचा कार्यकर्ता. एकही शब्द तोंडातून काढत नाही कारणं तुम्ही खा आम्हाला पण घाला अशा तत्वावर सर्व काम चालतं त्यावेळी वादग्रस्त वक्तव्य करायचं खुळ कुठ जात.
माजी मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं धरणात पाणी नाही मुतू कां?? एका जिल्हा अग्रणी बँक अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी ज्यांनी धान्य पिकविले त्यांच्यासाठी शेतकरी साले कायमच रडत असतात. राज्यपाल जबाबदार व्यक्ती यांनी एक नाही तीन वादग्रस्त वक्तव्य केली महात्मा फुले सावित्रीबाई फुले. समर्थ रामदास स्वामी यांच्या विना छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण विचारत. गुजराथी राजस्थान माणसाला मुंबई मधून बाहेर काढल तर मुंबई मध्ये पैसा उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज. नेताजी सुभाषचंद्र बोस. चंद्रशेखर आझाद. भगतसिंग. हे दुसर्याच्या घरांत जन्माला यावं माझ्या घरात नाही. सुषमा अंधारे यांनी भलतंच वादग्रस्त वक्तव्य संताबधदल केले संतांनी समाज घडविला पण सुषमा अंधारे यांच्या मते संतांनी रेड्याला शिकविले. चंद्रकांत पाटील यांनी देव आणि महापुरुष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं की हे सर्व बॅचलर नव्हते. सर्व ठिकाणी शिक्षणाची गंगा पाटविणारे यांनी भिक मागून शाळ चालवल्या असं वादग्रस्त वक्तव्य केले. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेने बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना उलट टांगल असतं. नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना सर्व मुस्लिम समाज मानतो अशा प्रेषित मोहम्मद पैगंबर बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. प्रसाद लाडा यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठ झाला हे माहीत नाही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं. प्राध्यापक के एस भगवान यांनी तर कहरच केला त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं भगवान श्रीराम हे दुपारच्या वेळी सीते सोबत बसून दारू प्यायचे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार भाई जगताप यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य. कपिल दहेकर जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापून आणणारे यांना दहा लाखांचे बक्षीस. बागेश्रवर तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य . जयंत पाटील वादग्रस्त वक्तव्य करुन समाज किती पेटतो ते बघा.
गिरिधर स्वामी यांनी यांनी श्रीमंत देवस्थान शिर्डी साईबाबा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. स्टिव्ह स्मिथ या खेळाडूने वादग्रस्त वक्तव्य केले चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सराव सामना खेळणयापेक्षा एकट्याने केलेला सराव कधीही चांगला हे खेळाडू साठी केलेले वादग्रस्त वक्तव्य. गोपीचंद पडळकर यांचें वादग्रस्त वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरदचा शमशुधदिन आणि अजितचा अझरुद्दीन झाला असतां. रामदेव बाबा यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्यामध्ये मुस्लिम दहशतवादी. हिंदू समाजातील मुलींना यांच्यापासून धोका. जिहाद नावाखाली दहशतवादी. शिवसेना महिला पदाधिकारी . महिलांनी काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात. साधत खरगे स्वातंत्र्य लढयात तुमच्या गटातील कुत्र्याने ही जीव दिला नाही असं वादग्रस्त वक्तव्य भाजप बद्दल केले. प्रकाश आंबेडकर यांनी शहा मोदी यांना २०२४ पर्यंत तुरुंगात टाकू. नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले . तेलंगणा आमदार राजा सिंग यांचें प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य. मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.
तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आत्ताच मराठा आरक्षणविषयी खाज का निर्माण झाली. विक्रम बाबा पावसकर यांनी मुस्लिम समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्द वापरले लांडा मुस्लिम. मुस्लिम समाजातील मुलींनी हिंदू मुलांसोबत लग्न करा . कालिचरण बाबा यांनी एका कार्यक्रमात हिंदू समाजातील लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आपणांस येत्या दहा वर्षांत बुरखा घालून राहावे लागेल. रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांचा एकेरी उल्लेख करुन वादग्रस्त वक्तव्य केले. संभाजी भिडे यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले तु आगोदर टिकली लाव तरच मी तुझ्याशी बोलेण. आंब्याची फळे खा म्हंजे मुलगा होईल हे शोभेल नाही. अब्दुल सत्तार यांनी एका महिलेचा अपमान वादग्रस्त वक्तव्य करुन केला इतकी भिकारचोट बाई असेल हेच ते वादग्रस्त वक्तव्य.
भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी छत्तीसगड सरकार बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले मी थुंकले तर छत्तीसगड सरकार वाहून जाईल. वारिस पठाण वादग्रस्त वक्तव्य. बिग बाॅस कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य. मुंबई शिवसेना आमदार यांनी मुलीच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले मुली असतातच पळवून आणण्यासाठी. तुम्ही मुली पळवून आणा. रामदास आठवले यांनी थोर साहित्यिक आण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले माझी मैना गावाकड राहीली म्हणून मुंबई मध्ये एक ठेवली.
अशी नाही अनेक प्रकरणं वादग्रस्त आहेत पण कोणीही समाज. एक व्यक्ती. याबाबत उठाव करत नाही कारणं आज प्रत्येक समाज हतबल झाला आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रत्येकजण प्रत्येक पक्षांतील नेत्यांच्या मध्ये मिंदा आहे त्यामुळे आपलया धर्माच्या. विचार. आचार. यांच्या अस्मिते पर्यंत हे पोहचले पण आपणं अजून गप्प आहोत. अस किती दिवस चालणारा आणि आपणं स्वातंत्र्य भारतात वावरतो मला नाही वाटत असं.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859