सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध काळ्या फीती लावून करण्यात आला. यावेळी वारीशे यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. तसेच याप्रसंगी निषेधाच्या घोषणाही उपस्थितांकडून देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर , ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, देवयानी वरसकर, बाळ खडपकर, बंटी केनवडेकर, प्रदीप सावंत, संतोष गावडे, हरिश्चंद्र पवार, महेश सरनाईक, सुहास देसाई, विलास कुडाळकर, चंद्रकांत सामंत, विनोद दळवी, राजन नाईक, विजय पालकर, नंदकिशोर महाजन, विकास गावकर, प्रभाकर धुरी, अशोक करंदीकर, नंदकुमार आयरे, रवी गावडे, रमेश जोगळे, दाजी नाईक ,दीपेश परब ,विनोद परब, मनोज वारंग, एकनाथ पवार ,संदीप गावडे ,चंद्रशेखर देसाई, अयोध्याप्रसाद गावकर , रामचंद्र कुडाळकर ,महेश रावराणे आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.