You are currently viewing कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री. देव रामेश्वराच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्यात आ. वैभव नाईक झाले सहभागी

कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री. देव रामेश्वराच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्यात आ. वैभव नाईक झाले सहभागी

कांदळगाव ते कोळंब पर्यंत पायी चालत घेतले दर्शन

मालवण तालुक्यातील कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री. देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र,तरंग,व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी आज कांदळगाव येथून किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना झाले. या मार्गात ठिकठिकाणी रामेश्वर देवतेचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते. त्यांनी कांदळगाव ते कोळंब पर्यंत पायी चालत श्री. देव रामेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, मंदार ओरसकर,कांदळगाव सरपंच रणजित परब, कोळंब सरपंच सिया धुरी, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर,बाबली कांदळगावकर,जी.एस. परब आदींसह कांदळगाव वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा