नानेली
दि. 26 आक्टोबर 2020 रोजी जि.प. प्राथमिक शाळा नानेली नं. 1 ता. कुडाळ शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत समाजासाठी, शालेय विद्यार्थीनींसाठी शैक्षणिक सहकार्याचे प्रेरणादायी कार्य करणारे समाजगौरव सन्मानासहीत जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार 2019, महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2019, गुरू सेवारत्न सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2019, नगरवाचनालय वेंगुर्ला आदर्श शिक्षक पुरस्कार, Builder of the Nation Award तसेच Dr. सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय शिक्षकरत्न विशेष पुरस्कार 2019 मराठा सेवा संघ यांच्याकडून समाजभूषण 2020 पुरस्कार .असे विविध पुरस्कार प्राप्त झालेले चंद्रकांत तुकाराम सावंत सर आंबोली गावठणवाडी (पदवीधर शिक्षक , जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तथा माजी मुख्याध्यापक, जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे ता. सावंतवाडी) यांचा सन्मान श्री. प्रज्ञेश प्रकाश धुरी (सरपंच नानेली ) व मुकुंद बाबली सावंत , (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नानेली ) यांच्या हस्ते, श्रीम. चेतना भारत म्हाडगूत (ग्रामसेवक नानेली ), श्रीम.वैभवलक्ष्मी मेस्त्री (उपाध्यक्षा माता – पालक संघ, विनायक मेस्त्री ( सदस्य शाळा व्यवस्थापन समिती) श्रीम. प्रज्ञा घाडी (सदस्या माता पालक संघ) साबाजी घाडी (ग्रामस्थ), प्रताप धुरी (शिक्षक मित्र ) मुख्याध्यापक मनोज गोविंद गुंजाळ व उपशिक्षिका श्रीम.श्रद्धा राजाराम शेडगे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या तसेच गोविंद चव्हाण ( केंद्रप्रमुख माणगाव नं.१ ) यांनीही शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी चन्द्रकांत सावंत सरांनी शालेय एक विद्यार्थीनी दत्तक घेताना तीन हजार रुपये अध्यक्ष व मुख्याध्यापक यांजकडे सुपुर्द करत सिंधुदुर्ग जि. प. 55 शाळांमधून 68 विद्यार्थीनी व माध्यमिक 5 शाळांमधील 24 विद्यार्थीनी मिळून एकूण 60 शाळांमधील 92 विद्यार्थीनी दत्तक घेतलेल्या आहेत.
चन्द्रकांत सावंत यांनी आपली सन्मानाची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आदरनिय राजाराम शेडगे (मुख्याध्यापक शाळा हळदीचे नेरूर दुकानवाड )व श्रद्धा शेडगे या उभयतांना देऊन आदरयुक्त आपुलकीचा मान सन्मान केला.
शेवटी उपशिक्षिका श्रीम.श्रद्धा शेडगे
यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यकमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोज गुंजाळ यांनी केले.