देवगड : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोंड परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
या कार्यक्रमात संतोष तांबे, योगेश कोळसंबकर, सौरभ मोंडकर, मनोज माणगांवकर, रोहन मोंडे, प्रकाश मोंडे, सर्वेश अनभवणे, अजय अनभवणे, पियूष कोळसंबकर आणि रविराज नाटेकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या वेळी माजी आमदार अजित गोगटे,पडेल मंडल भाजपा अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, योगेश चांदोस्कर, देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि युवा विधी तज्ञ ॲड. सिद्धेश अविनाश माणगांवकर उपस्थित होते.