*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज – काव्यचरितावली*
*काव्यपुष्प -१३ वे*
—————————————–
श्रीअक्कलकोट, तसेच हुमणाबाद झाले
स्वामी समर्थ, श्रीमाणिकप्रभ सिद्ध भेटले
परी अजुनी श्रीसद्गुरू नाही ना भेटले
शोधार्थ श्री महाराज दूर दूर फिरत राहिले ।।
अबुच्या पहाडावरी जाता तिथे योगी भेटले
योगियाच्या सहवासात राहून इथे मग
श्रीमहाराजांनी योग -विद्या ज्ञान मिळविले
योग्याच्या सांगण्यावरून ते काशीला आले ।।
अवधुतवृत्तीचे श्रीतेलंगस्वामी इथे भेटले
त्यांनी प्रेमाने श्रीमहाराजांना ठेवून घेतले
श्रीमहाराज ही स्वामींच्या सेवेत रमून गेले
या तेलंगस्वामींची कृपा नि प्रेमही लाभले ।।
तेलंगस्वामी श्री महाराजांना आशीर्वाद देती
तुझे काम लवकरच होईल,
तुझ्या मनासारखे होईल ।
निरोप घेउनी स्वामींचा श्री महाराज निघाले ।।
म्हणे कवी अरुण दास , सद्गुरू कृपेने
ही काव्य चरितावली अक्षर – सेवा करितो ।।
———- ————————-
श्रीगोंदवलेकरमहाराज – काव्यचरितावली –
काव्यपुष्प -१३ वे
कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे -पुणे
9850177342
******