You are currently viewing कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजावर 50 टक्के सवलत – जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजावर 50 टक्के सवलत – जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजावर 50 टक्के सवलत – जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी

इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांचेमार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मुदती कर्ज,बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्जमार्जिन मनी कर्जया सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विका महामंडळ मर्याचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.

            तरी संबंधित सर्व कर्ज खातेधारकांना कळविण्यात येते की सदर योजना माहे मार्च २०२३ पर्यंतच असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे असे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८११९, ८६६८८९८९५० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रूपये १०.०० लक्ष कर्ज व्याज परतावा योजनेतर्गत तसचे विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा