You are currently viewing दोडामार्ग रुग्णालयात महारक्तदान शिबिर व जागरूक पालक सुदृढ बालक अभियान

दोडामार्ग रुग्णालयात महारक्तदान शिबिर व जागरूक पालक सुदृढ बालक अभियान

जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रमुख उपस्थिती

दोडामार्ग

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन च्या वतीने तालुक्या तालुक्यात महारक्तदान शिबिर व जागरूक पालक सुदृढ बालक अभियान राबवले जात आहे. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातही हे महारक्तदान शिबीर व जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, शिवसेना (उ बा.ठा.) उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक राजेश प्रसादि, नगरसेविका गौरी पार्सेकर, राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस, डॉ. रामदास रेडकर, इतर डॉक्टर तसेच रुग्णालयीन कर्मचारी पालक आणि रक्तदाते उपस्थित होते.

यावेळी अनेक दात्यांनी रक्तदान केले तसेच उपस्थित पालकांना जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाची माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + one =