You are currently viewing राज्यस्तरीय संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानला प्रदान

राज्यस्तरीय संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानला प्रदान

सचिव अंकुश भोईर हे राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

 

 

पालघर :

पालघर येथील भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४७ जयंती चे औचित्य साधून श्रावस्ती बहुउद्देशीय संस्था इचलकरंजी येथे खाजदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघ यांच्या वतीने राज्यस्तरीय संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सचिव अंकुश धाऊ भोईर यांना राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी हातकलंगणे चे आम. डॉ. सुचित मंणचेकर, माजी खासदार राजू शेट्टी, श्रावस्ती बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्षा भक्ती भावे, सचिव राहुल वराळे, भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव अंकुश भोईर, खजिनदार सौ. अंकुश भोईर, सौ.दिशा दिनेश भोईर, देवगड चे रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषेश म्हणजे पालघर जिल्ह्यातून भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान व स्वाभिमानी चर्मकार महासंघ पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांमध्ये उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातून ४ व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिक्षण सामाजिक क्षेत्रामध्ये गरीब गरजू व्यक्तींना मदत निधी शैक्षणिक साहित्य मतदान रक्तदान शिबिर विविध उपक्रम राबवण्यात येत होते. भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक सचिव अंकुश धाऊ भोईर यांना राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विक्रमगड माण शासकीय आश्रमशाळातील शिक्षक श्री चेतन पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला व वाडा येथील आयुर्वेदिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे लोकांचे आयुष्य वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे आयुर्वेदिक कार्य अरुण बेनके यांना राज्यस्तरीय आरोग्य दूत प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचे नामांकन भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा