You are currently viewing हुंबरट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

हुंबरट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

विधवा, परितक्त्या महिलांना हळदी कुंकूचा मानसन्मान

कणकवली

कणकवली तालुक्यातील हुंबरट ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबविला असून गावातील विधवा, परितक्त्या महिलांना हळदी कुंकूचा मान सन्मान देत एका चांगल्या प्रथेची सुरुवात केली..

ग्रामपंचायत हुंबरट तालुका कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या ग्रामपंचायतीने सरपंच श्रीम. मनीषा मनोहर गुरव यांच्या कडून एका सुहासिनीला हळदी कुंकू वाहून वान देण्यात आले.
यावेळी हुंबरट सरपंच श्रीम. मनीषा मनोहर गुरव, ग्रामसेवक वैभव वसंत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या रिया राजेंद्र पांचाळ, शरिफा सईद काझी, प्रेरणा भिकाजी दळवी, सुचिता सुहास दळवी, आरोग्य सेविका योगिता गोसावी, तलाठी योजना सापळे, माजी सरपंच अर्चना वायंगणकर तसेच, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गुरव, सुनील गुरव, समीर होळकर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा