आ. नितेश राणे यांनी वनविभागाला सल्लागार समितीच्या बैठकीत केले होते सुचित
कणकवली:
आमदार नितेश राणे यांची कार्यतत्परता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार शेतकऱ्यांना दिसून आली. वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे, आणि नुकसान झाल्यास योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आवश्यक असलेला अहवाल वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ मंडळींकडून घ्यावा असे आमदार नितेश राणे यांनी वनविभागाला सल्लागार समितीच्या बैठकीत सुचित केले होते. त्या सूचनेनुसार वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशाने वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सदस्यांच्या गठीत केलेल्या समितीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि देवगड तालुक्यात पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान शेतीमध्ये जाऊन या समितीने वन्य प्राण्यांकडून कशा पद्धतीने नुकसान केली जाते आणि त्या नुकसानीची तीव्रता किती आहे.हत्ती,माकड,रानडुक्कर, गवे रेडे,सांबर,साळींदर, खार, शेकरू शेतीचे कशा प्रकारे नुकसान करतात यावर समितीने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवण्यासाठी आमदार नितेश राणे यांचा सहभाग असलेल्या सल्लागार समितीने सुचित केलेल्या प्रमाणे वनविभागाच्या अधिकारी स्तरावरील एक समितीने ७ फेबरुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.यावेळी फळझाडांचा मोहोर, फळे, फुलोरा,पालवी इत्यादी ची वन्यप्राण्यांमुळे होणारी नुकसानी,त्या नुकसानीचे प्रमाण, मापंदड व मोबदला देणेकरीता कार्यपध्दती ठरविण्यासाठी चा अहवाल ही समिती देणार आहे.
तसेच नुकसानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या कराव्यात या ते सुचविणार आहेत. या समितीचे प्रमुख म्हणून मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर चे आर. एस. रामानुजम, सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री रेड्डी, बाळासाहेब कोकण कृषी महाविद्यापीठ दापोलीचे अर्थतज्ञ, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शिरसागर, उद्यानविद्या शाखेचे प्राध्यापक योगेश परुळेकर, प्राध्यापक विनायक पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर आदी चा या समिती मध्ये समावेश आहे.आमदार नितेश राणे यांनी सूचित केलेल्या प्रमाणे राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांची ही समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे.
हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणाऱ्या नुकसानीवर लक्ष वेधला होता. त्यानंतर मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आमदार नितेश राणेंच्या प्रत्येक सूचनेवर अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले होते त्याप्रमाणे तज्ञ मंडळींची समिती ही गठीत केली आहे.या समितीने आज कुडाळ वाडोस येथे बाळकृष्ण बेळणेकर,यांच्या बांबू, नारळ बागेस भेट देवून पाहणी तर निळेली येथील प्रकाश माणगावकर यांच्या केळी व काजू उत्पादक बागेस भेट दिली व शेतकऱ्यांशी चर्चा केली.