You are currently viewing साळगाव-जांभरमळा येथे जलजीवनच्या नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन…

साळगाव-जांभरमळा येथे जलजीवनच्या नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन…

कुडाळ

साळगाव-जांभरमळा येथे शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल खोदणे,पाईप लाईन करणे,टाकी बांधणे या कामासाठी ८६ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. आज या कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वती श्री.नाईक व श्री. पडते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शाखाप्रमुख हेमंत सावंत, उपशाखाप्रमुख नामदेव तावडे,ग्रामपंचायत सदस्य बाबाजी सावंत, सदस्या तेजस्विनी सावंत, सदस्या मानसी धुरी, सदस्या सिद्धी मेस्त्री,तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम धुरी,उपाध्यक्ष अविनाश धुरी, युवासेना उपविभागप्रमुख रोहित सावंत,बंड्या कोरगावकर,चेतन सावंत,राकेश धुरी, माजी ग्रा.प.सदस्य दत्ताराम लाड, जेष्ठ शिवसैनिक सावंत गुरुजी, माजी शाखा प्रमुख गणेश धुरी, बाबा धुरी, शिवाजी टिळवे, संदीप सावंत, रुपाली सावंत, चंद्रावती सावंत,समीक्षा सावंत, नमिता घाग, दीपाली धुरी, रसिका धुरी, जमीन मालक शुभांगी खेमासावंत, सत्यभामा धुरी, दिगंबर सावंत, पूर्वा धुरी, माधवी धुरी आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा