You are currently viewing सावंतवाडी शहर मर्यादित मनसे वतीने भव्य किल्ला स्पर्धाचे आयोजन..

सावंतवाडी शहर मर्यादित मनसे वतीने भव्य किल्ला स्पर्धाचे आयोजन..

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी शहर मर्यादित भव्य किल्ला स्पर्धाचे आयोजन दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून शहर मर्यादीत किल्ला स्पर्धा आयोजित केली आहे तरी इच्छुकांनी 8888369066,9423952343 ह्या नंबर वर संपर्क साधावा.

या स्पर्धेत प्रथम तीन पारितोषिक काढले जातील यात रोखरक्कम व प्रमाणपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तेजनार्थ अशी पारितोषिके ठेवण्यात आली असून दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसात परीक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक येतील व त्यातून पहिले तीन क्रमांक तसेच उत्तेजनार्थ क्रमांक देखील काढले जातील तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा