बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूह यांच्या संयुक्त सहकार्याने होणारा व्यापक कार्यक्रम.
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे ‘सेकंड इनिंग’ हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारीला सकाळी १० ते १ असा हा कार्यक्रम होणार आहे. ‘वृद्धत्व व्यवस्थापन’ या बद्दल माहितीचा प्रसार करणे हा या कार्यक्रम तथा शिबिराचा उद्देश आहे.
सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि समस्या या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहेत. वृद्धत्व हा सगळ्यांसाठीचा असा टप्पा आहे.या टप्प्यावर माणसाचे जगणे सुसह्य व्हावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक आरोग्य या पाचही घटकांनी मिळून त्याची आधाराची काठी व्हावे आणि आनंदाने आयुष्य सुसंपन्न व्हावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
ही इच्छा, वार्धक्याचे सुनियोजित व्यवस्थापन करून, जाणीवपूर्वक कशी प्रत्यक्षात आणता येईल याचेच मुद्देसूद मार्गदर्शन पुणे येथील डाॅ. रोहिणी पटवर्धन करणार आहेत.
ॲड. देवदत्त परुळेकर ( अध्यक्ष, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण)
डाॅ.रोहिणी पटवर्धन यांनी वृद्ध कल्याण शास्त्र या विषयात पी.एच.डी.केली आहे. ‘सन वर्ल्ड सोसायटी फाॅर सोशल सर्व्हीस’ या वृद्धांसाठीच्या संस्थेची जबाबदारी त्या सांभाळत असून ज्येष्ठ नागरिकांना उत्तमरितीने जगता यावे ही त्यांची तळमळ आहे.
वैशाली पंडित ( संस्थापक सदस्य, ऐलमा पैलमा अक्षरदेवा समूह)
प्रत्येक व्यक्तीचे आयुर्मान वाढल्यामुळे ६० वर्षांच्या पुढे जगण्याचा कालावधी वाढलेला आहे. ही वाढलेली जवळपास सरासरी २० वर्षे समाधानात आनंदात आणि आरोग्यपूर्ण जावी म्हणून प्रत्येक व्यक्तीने काही विषयांची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये अत्यंत वेगाने बदल होत आहेत आपली मुले आपल्याजवळ असतील ,आपली काळजी घेण्यासाठी उपलब्ध असतील असं खात्रीने म्हणता येत नाही. अशा वेळी आपण पुढच्या आयुष्याबद्दल नियोजनबद्ध विचार करणे हाच उत्तम उपाय आहे. यासाठी प्रत्येकानेच अगदी जुजबी का होईना पण ट्रेनिंग घेणे योग्य ठरते. ट्रेनिंग घेतल्यामुळे त्या व्यक्तीला तर निश्चितपणे फायदा होतो. पण कुटुंबालाही ,आपल्या जवळच्या लोकांना ही त्याचा फायदा होतो. त्यासाठी प्रशिक्षण घेताना काही विषयांची माहिती असणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात डाॅ. रोहिणी पटवर्धन खालील संबंधित पुढील मुद्द्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
१. वृद्ध कल्याण शास्त्राची ओळख. २.सहभाग आणि सह -अनुभूती कार्यशाळा .
३.सामाजिक आरोग्य. ४.आपल्यासाठी आपणच तत्त्वाच्या बद्दल माहिती.
५. भावनांची अभिव्यक्ती .
६. उत्तरायुष्याचे व्यवस्थापन. ७.रोल प्ले टेक्निक
८ पैसे का खर्च करा.
८. वैद्यकीय इच्छापत्र
१०. काळजी घेणा-यांची काळजी.
ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची सेवा करणारे तरूण,प्रौढ सा-यांसाठीच हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असेल. ज्येष्ठांबद्दल आदर आणि आस्था असणा-या सगळ्यांनाच आग्रहाचे आहे असे सामाजिक आवाहन श्री.देवदत्त परूळेकर ( अध्यक्ष बॅरि.नाथ पै सेवांगण) आणि वैशाली पंडित( संस्थापक सदस्य -ऐलमा पैलमा अक्षरदेवा समूह सदस्य) यांनी केले आहे.
या शिबिर तथा कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी वैशाली पंडित ‘९४२२०४३०२५’ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.