वेंगुर्ले
सोन्सुरे (आरवली) तालुका वेंगुर्ला येथे श्री देव कोकणेश्वर देवस्थान, व्हिजन आय प्लस शिरोडा, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,( सिंधुदुर्ग) लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण प्राथमिक शाळा आरवली सोन्सुरे-आरवली या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. मोफत नेत्र तपासणी शिबिरात ५६ नेत्र रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराचे वैशिष्ट्य कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन पूर्व सल्ला, अनुभवी नेत्र चिकित्सक, शालेय विद्यार्थ्यांची विशेष नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मा वाटप, माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अशा सुविधा देण्यात आल्या.
या शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शने केले होते. नेत्र शिबिराचे उद्घाटन श्री.देव कोकणेश्वर मंडळ अध्यक्ष विलास चिपकर,आरवली सरपंच तातोबा भास्कर कुडव यांनी केले.
यावेळी उपस्थित श्री देव कोकणेश्वर देवस्थानचे मानकरी श्री.सावळ, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सोहम शारबिंद्रे ( व्हिजन आय प्लस- शिरोडा) माजी तालुका अध्यक्ष अमेय मोरे,अमोल चव्हाण, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर नाईक,रामकृष्ण पाटणकर, द्वारकानाथ सावंत श्रध्दा पेडणेकर,ओझोन ऑप्टिकल म्हापसा-गोवाचे प्रथमेश जैयनालकर, आय केअर ऑप्टिकल सावंतवाडीचे नितीन नाईक, दिव्या सावळ, दीपक राणे. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका सदस्य तथा स्पेक्टो मार्टचे मंगेश चव्हाण व लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ.अशोक कदम ग्रामस्थ उपस्थित होते.