You are currently viewing बिरोडकर टेंब प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा मानकरी मयुरेश वॉरियर संघ तर जय ऐट उपांत्य..

बिरोडकर टेंब प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा मानकरी मयुरेश वॉरियर संघ तर जय ऐट उपांत्य..

महिलांच्या सामन्यात आमची संघाची साई स्पोर्ट संघावर मात..

सावंतवाडी

बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ आयोजित बिरोडकर टेंब प्रीमियर लीग पर्व तिसरे चा मानकरी मयुरेश वॉरियर्स ठरला या संघाचा संघ मालक प्रवीण पेडणेकर व आयकॉन खेळाडू शुभम बिरोडकर यांच्या तुफान फटकेबाजी मुळे प्रिमियर लीगच्या चषकावर मयुरेश वाॅरीयर्स ने आपले नाव कोरले तर उपविजेता जय एट संघ ठरला, तृतीय क्रमांकावर गत विजेत्या शिव स्पोर्ट संघाला समाधान मानायला लागले तर दुर्वांचॅम्स संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.

विजेत्या संघाचा आयकॉन खेळाडू शुभम बिरोडकर यांच्या तुफान फटकेबाजी मुळे सुरुवातीपासूनच हा संघ एक हाती जिंकत गेला ,त्यांनी उत्कृष्ट खेळ करत मालिकावीरचा बहुमान पटकावला, तर एक हाती आपल्या संघाला प्रत्येक सामन्यात विजय संपादन करून देणाऱ्या जय ऐट संघाचा संघ मालक व स्वतः मालक महेश गोसावी सामनावीरचा ठरला.

प्रत्येक सामन्यात महेश गोसावी सामनावीर राहिला तर गतवर्षीच्या शिव स्पोर्ट्स संघाने कडवी झुंज देत सेमी फायनल पर्यंत प्रवेश केला मात्र मयुरेश वाॅरीर्यर्स अचूक क्षेत्ररक्षण व संयमी खेळी केली त्यामुळे शिवस्पोर्ट संघाला पराभव पत्करावा लागला व तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, अंतिम सामन्यात मयुरेश वाॅरीयर्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी उतरलेल्या जय ऐट संघाचा संघ मालक व कर्णधार महेश गोसावी हा लवकर बाद झाल्याने संघ फक्त २४ धावा जमवू शकला, मात्र हे आव्हान मयुरेश वाॅरियर्स संघाने सहज पार केले पर्व तिसऱ्या चषकावर व ढालीवर आपले नाव कोरले तर सहभागी इतर सहभागी चार संघांना सहभाग चषक देण्यात आले ,त्यात साई सावली ,अनाया स्टार ,एलडी स्पोर्ट व बीके एम एम या संघाचा समावेश होतो.

या स्पर्धेचा उगवता तारा म्हणून मयुरेश वाॅरीयर्स संघाचा साहिल गावडे याची निवड करण्यात आली त्याला पुष्कर परब यांनी पुरस्कृत केलेली बॅट देण्यात आली.

दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात महिलांचाही सामना भरविण्यात आला, त्या सामन्यात आमची एकजूट संघाने साई स्पोर्ट्स संघावर मात करून विजय संपादन केला, या सामन्याची सामनावीर म्हणून प्रांजल बिरोडकर हिला गौरविण्यात आले.

स्पर्धेचे पंच म्हणून प्रशांत बिरोडकर, अमेय परब ,अमित परब, प्रमोद पेडणेकर, प्रथमेश गावडे, कुलदीपक बिरोडकर, विकी बिरोडकर यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ भोसले कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला.

[बिरोडकर टेंब प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा मानकरी मयुरेश वॉरियर संघ तर जय ऐट उपांत्य महिलांच्या सामन्यात आमची संघाची साई स्पोर्ट संघावर मात.

प्रतिक्रिया व्यक्त करा