वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे शिवसेनेत
खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना कनेडी शाखा येथे माजी केंद्रीय मंत्री ,शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत व खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. एकनाथ कोकाटे यांच्या समवेत शैलेश कोकाटे अंकिता कोकाटे शर्वरी कोकाटे शोभा पाष्टे शुभम पाष्टे प्रमोद केसरकर संगीता गांगण आदींसह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,अतुल रावराणे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत आदींसह वारगाव मधील ज्येष्ठ शिवसैनिक मधुकर वळंजु, माजी सरपंच बापू नर,बाळा राऊत,अंजली मेस्त्री, अरुण मेस्त्री, संतोष सोरप,जयेश नागवेकर, प्रथमेश नर आदीसह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.
खारेपाटण विभागाचे माजी जि.प.सदस्य स्वर्गीय बाळा वळंजु यांचे विश्वासू सहकारी राहिलेले एकनाथ कोकाटे हे खारेपाटण विभागातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते. सहकाऱ्यांसमवेत त्यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.