You are currently viewing शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

 सिंधुदुर्गनगरी 

 क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20,2020-21 व 2021-22 चे पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात विहित मुदतीत दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजीपर्यंत  कार्यालयीन वेळेपर्यंत पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

            क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षीचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने, शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्यामधील लिंकवर पहावे. साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील 30 जून रोजी सपण्यांऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल.

            संचालनालयाने दि. 13 जानेवारी 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्र टिपणीव्दारे पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास  दि. 16 ते 30 जानेवारी 2023 अशी मुदत दिलेली होती. तथापि, या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर व स्पर्धा यासाठी अर्ज करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती राज्यातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी शासनाकडे केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा