लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार;
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई
‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ असा ध्यास असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि. 27 ऑक्टोबर 2020 ते 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-2020’ साजरा करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे. सुजाण नागरिकांनी तसेच अन्य कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई, येथे संपर्क साधावा, असे आवाहन या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी केले आहे.
संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई. टोल फ्री क्र.1064, दूरध्वनी क्र.-022-24921212, फॅक्स क्र.022-24922618.
वेबसाईट : acbmaharashtra.gov.in
ई-मेल : acbwebmail@mahapolice.gov.in
ई-मेल : addlcpacbmumbai@mahapolice.gov
फेसबुक : www.facebook.com-Maharashtra-
मोबाईल ॲप : www.acbmaharashtra.net
ट्वीटर : @ACB_Maharashtra
व्हॉटस् ॲप : 9930997700
If you find any state Government employee demanding bribe or is involved in corruption kindly contact anti-corruption bureau, Brihan Mumbai unit, 91 sir pochakhanwala Road, worli, Mumbai- 30, Telephone No.24921212, Fax 24922618, toll Free No.1064 or Contact us on Email- “addlcpacbmumbai@mahapolice.
भ्रष्टाचार हा विकास कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम केवळ आठवडाभर न राबविता नियमितपणे राबविले गेले पाहिजे. याकामी खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि सुजाण नागरिक मोठी मदत करु शकतात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे.