You are currently viewing सावंतवाडीकरांचे आरोग्य सृृदृढ – परिमल नाईक

सावंतवाडीकरांचे आरोग्य सृृदृढ – परिमल नाईक

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” योजनेनंतर अहवाल

सावंतवाडी
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या सर्व्हेक्षणाची दुसरी फेरी पुर्ण झाली आहे.यात सावंतवाडीकरांचे आरोग्य सृदृढ असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबतची माहिती पालिकेचे आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी दिली.
दरम्यान हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्‍या नागरीक व पालिका कर्मचार्‍यांचे त्यांनी आभार मानले आहे.त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.यात तब्बल ७३४१ इतकी कुटूंबे सर्व्हेक्षित करण्यात आली आहे.यातील लोकसंख्या १८ हजार ९७५ इतकी असून त्यातील लोकांचे आरोग्य सृदृढ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा