आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी
निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा करण्यास भाग पाडले
आ. वैभव नाईक यांनी २ कोटी ४५ लाख रु. चा निधी मंजूर केलेल्या देवबाग येथील जिओ ट्यूब बंधाऱ्याचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने या कामाची आमदार वैभव नाईक यांनी राज्यशासनामार्फत चौकशी लावली.ग्रामस्थांना दर्जेदार कामाची ग्वाही आ.नाईक यांनी दिली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवून दर्जेदार काम होण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यास भाग पाडले. राज्य शासनामार्फत चौकशी होऊन काम निकृष्ट झाल्याचे सिद्ध झाल्याने सदर जिओ ट्यूब बंधाऱ्याच्या कामाची पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून पुन्हा नव्याने काम सुरु करण्यात आले आहे.खासदार विनायक राऊत यांनी देखील दर्जेदार काम होण्यासाठी पाठपुरावा केला होता.
त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांनी देवबाग मोबारवाडी येथे समुद्री धूपप्रतिबंधक दगडी बंधाऱ्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ४ कोटी रु मंजूर केलेले काम देखील सुरु करण्यात आले असून या दोन्ही कामांची आज आ. वैभव नाईक यांनी पाहणी केली. ठेकेदारांना दर्जेदार काम करण्याच्या स्पष्ट सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या. हि दोन्ही कामे सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले. मालवण तालुक्यातील उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱयांसाठी देखील निधी मंजूर असून हि कामे देखील लवकरच मार्गी लागतील. आज एमसीझेडएमए ची १६३ वी बैठक झाली त्यात देवबाग येथील दुसऱ्या टप्प्यातील बंधाऱयाच्या कामाला सीआरझेडची परवानगी मिळाली असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, राजू परब, करण खडपे, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, राजू मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व देवबागचे ग्रामस्थ उपस्थित होते.