You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापना सिंधुदुर्ग उपजिल्हा संघटक पदी अभय देसाई यांची नियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापना सिंधुदुर्ग उपजिल्हा संघटक पदी अभय देसाई यांची नियुक्ती

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी स्थापत्य अभियंता अभय देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या आदेशांनुसार रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना राज्य अध्यक्ष योगेश परूळेकर, कार्याध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस विजय जाधव,उपाध्यक्ष अमित शिंदे यांचेकडून मुंबई येथे सिंधुदुर्ग उपजिल्हा संघटक पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत रचनात्मक कार्ये व लोकहिताचे सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे अभय देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ह्यावेळी नियुक्तीपत्र स्विकारताना जिल्हासंघटक अमोल जंगले उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा