You are currently viewing मालवणमध्ये बॅनर काढल्याने भाजप-शिवसेना युवा कार्यकर्ते आक्रमक

मालवणमध्ये बॅनर काढल्याने भाजप-शिवसेना युवा कार्यकर्ते आक्रमक

मालवण

मालवण शहरातील प्रसिद्ध अशा भरड नाक्यावर आंगणेवाडी यात्रा उत्सवासाठी शुभेच्छा देणाऱ्या बॅनर वरून शिवसेना आणि भाजप युवा मोठा वाद रंगला. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याद हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला. तरीही युवा कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरूच होती.
ठाकरे गट शिवसेनेकडून दोन महिने अगोदरच भरड नाक्यावर कमान उभारण्याची परवानगी घेतली होती. त्यानुसार त्यांनी कमान उभारली. मात्र भाजपच्या युवा कार्यकर्ते असलेला एक बॅनर त्याठिकाणी लावण्यात आलेला होता. तो बॅनर भाजपच्या काही युवा कार्यकर्ते यांना कल्पना देऊन काढण्यात आला. यावरुनच वाद निर्माण झाला. सकाळी भरड नाक्यावर भाजप युवा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर त्यांना शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनीही तोडीसतोड उत्तर दिले. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता भाजप पदाधिकारी यांनी समोपचाराची भाषा घेत दुसरीकडे बॅनर लावण्यावर पडदा टाकण्यात आला.
भाजपकडून अशोक सावंत, अशोक तोडणकर, ललीत चव्हाण, पालयेकर, सावंत तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेनेकडून हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार ओरसकर, किरण वाळके, उमेश मांजरेकर, ननो गिरकर, अमीत वाळके तसेच इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा