राष्ट्रीय पातळीवर करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
मालवण
पुणे- म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल(बालेवाडी) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १७ वर्षाखालील शालेय मैदानी मुलांच्या भालाफेक या क्रिडा प्रकारात कुडाळ हायस्कुल कुडाळ या शाळेतून वेदान्त याची स्पर्धेसाठी निवड झाली. मंगळवारी पार पडलेल्या या स्पर्धेत ४४.७० मीटर भाला फेकत दुसरा क्रमांक प्राप्त करत रौप्य पदकाचा मानकरी ठरला असून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे. वेदान्त हा चौके येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष रघुनंदन राणे यांचा मुलगा असून शालेय शिक्षण चौके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नं १ व भ.ता.चव्हाण,म.मा.विद्यालय येथे झाले असून या दोन्ही शाळेत क्रिडा प्रकारात वेदांन्तने तालुका- जिल्हा स्तरावर अनेक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवले होते.
सद्या वेंदान्त कुडाळ येथील कुडाळ ज्युनिअर काँलेज येथे ११ वीत शिक्षण घेत आहे.याच काँलेजच्या वतीने १७ वर्षावरील भालाफेक प्रकारात कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सहभागी होत वेदान्त याचा प्रथम क्रमांक आला होता.त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती .दिनांक ३१ रोजी पुणे- म्हाळूके येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल च्या मैदावर झालेल्या स्पर्धेत वेदान्त याने राज्यस्तरावर ४४.७० भाला फेकत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक प्राप्त केले.वेदांन्तच्या या कामगिरी साठी चौके हायस्कुल चे क्रिडा शिक्षक,कुडाळ ज्युनिअर काँलेजचे क्रिडा शिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले..चौके येथील या सुपुत्राने राज्यात नावलौकीक प्राप्त केले व राष्ट्रीय पातळीवर भालाफेक या क्रिडा प्रकारात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे..पुणे येथून विजयी पताका घेऊन आपल्या चौके या गावात येताना गावातील सीमेवर भव्य स्वागत करुन बाजारपेठ मार्गाने भव्य राँली काढत चौके ग्रामदेवता भराडी देवी मंदिरात यापुढे वेदान्त कडून आपल्या देशासाठी भरीव कामगिरी घडो यासाठी देवीला सांगणे करण्यात आले व वेदांन्तचे सरावाचे मैदान व चौके हायस्कुल शिक्षक याना नतमत्सक होत शुभेच्छांचा स्विकार केला.यावेळी पंचक्रौशितील प्रतिष्ठित मान्यवर,सरपंच,चिरेखाण व्यावसायिक,व्यापारी संघाचे सदस्य,ग्रामस्थ- युवक शालेय मुले,शिक्षक सहभागी झाले होते.