कणकवली
श्री देव रामेश्वर मंदिर हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून भिरवंडे येथे कृषी अवजारांचे प्रदर्शन व कृषी विभागाच्या अवजारांसाठी असलेल्या अनुदानाच्या योजनांसाठी अर्ज भरणे व शेतकर्यांना विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी व सावंत पटेल उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गचे अध्यक्ष मोहन सावंत यांच्या हस्ते व देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री देव रामेश्वर देवालये संचालक मंडळ भिरवंडे, ग्रामपंचायत भिरवंडे, भिरवंडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी व काव्या कृषी सेवा केंद्र कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने भिरवंडे गावात श्री देव रामेश्वर मंदिर नजीक कृषी अवजारांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन 3 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात कृषी विषयक पॉवर टिलर, भात कापणी यंत्र, पॉवर विडर, बॅटरी फवारणी पंप, नारळ शिडी, चैन स्वा, ग्रासकटर आदी अवजारे ठेवण्यात आली आहेत. तसेच शेतकर्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहेत. शेतकर्यांना कृषी अवजारांची माहिती देत त्यांचे अर्ज भरण्यात येत आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच नितीन सावंत, सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, शिवाजी सावंत, काव्या कृषी सेवा केंद्राचे प्रवीण राऊत, भाई सावंत, अरूण सावंत, अरविंद सावंत, श्रध्दा सावंत, कृषी सहाय्यक अर्चना केंद्रे, ज्योती सावंत, ऋषीकेश सावंत, प्रशांत सावंत, भिकाजी सावंत, पोलिसपाटील बाळकृष्ण सावंत, दशरथ सावंत, संदीप डोंगरे, जगदीश सावंत आदी उपस्थित होते.