You are currently viewing तरूण उत्साही सेवा मंडळाचा माघी गणेशोत्सव जल्लोशात संपन्न

तरूण उत्साही सेवा मंडळाचा माघी गणेशोत्सव जल्लोशात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बी. डी. डी. चाळ २७, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, पूर्व येथे तरुण उत्साही सेवा मंडळाच्या श्री माघी गणरायाची विधीवत स्थापना झाली. मंडळाचे हे ९वे वर्ष होते. मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

गणेश पूजन, होमहवन, आरती, महाप्रसाद ह्या प्रमुख शास्त्रोक्त विधींसह विवाहित जोडप्यांसाठी श्री तशी सौ, महिलांसाठी कार्यक्रम, गरबा, दशावतार, बाल गोपाळासाठी विविध स्पर्धांचे आयोजन मंडळाने केले होते.

गणेशभक्तांसाठी रोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात श्रींचे आगमन व विसर्जन करण्यात आले. त्यात मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विभागातील सर्व गणेशभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा