You are currently viewing इन्सुली-कोठावळेबांध शाळा नं. ८ मध्ये ‌पाणी टंचाई…

इन्सुली-कोठावळेबांध शाळा नं. ८ मध्ये ‌पाणी टंचाई…

मुलांचे तसेच शिक्षकांचे पाण्याविना अतोनात हाल…

ग्रामपंचायत ‌सदस्या वर्षा‌ सावंत आक्रमक ; सय्यमाचा बांध फुटल्यास महिलांना घेऊन ग्रामपंचायतीकडे घागर आंदोलन छेडण्याचा इशारा..

इन्सुली

इन्सुली-कोठावळेबांध शाळा नं. ८ मध्ये ‌पाणी टंचाई, मुलांचे तसेच शिक्षकांचे पाण्याविना अतोनात हाल, इतरांच्या थकीत पाणीपट्टीचा त्रास शाळेला का ? ग्रामपंचायत ‌सदस्या सौ.वर्षा‌ सावंत आक्रमक, ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप,सय्यमाचा बांध फुटल्यास महिलांना घेऊन ग्रामपंचायतीकडे घागर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

इन्सुली कोठावळेबांध मधील शाळा नं.८ मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शाळेतील मुलांचे तसेच शिक्षकांचे अतोनात हाल होताना दिसत आहे.ग्रामपंचायतीला वारंवार ‌कळवुन‌ सुद्धा संबंधितांचे पुर्णपणे दुर्लक्ष ‌होताना दिसत आहे.सरपंच यांना सांगितल्यावर एक दिवस पाणी सोडण्यात येते आणि बाकीचे दिवस वाट बघत बसावं‌‌ लागतंय.ग्रामपंचायत सदस्या सौं‌ वर्षा सावंत या सर्व प्रकाराला कंटाळून आक्रमक झाल्या असून इतरांनी पाणीपट्टी ‌भरली नाही म्हणून त्याचा त्रास शाळेला का असा‌ जाब सरपंचांना विचारला‌ आहे.लवकरात लवकर पाणीपुरवठा नियमितपणे सुरू करा आमचा‌ अंत‌ पाहु‌‌ नका आमच्या सय्यमाचा बांध फुटल्यास महिलांना घेऊन ग्रामपंचायतीकडे घागर आंदोलन छेडण्याचा इशारा सदस्या वर्षा सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =