You are currently viewing भय…..!

भय…..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*भय…..!*

*आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्।*

*धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः।।*

यातल्या फक्त पहिल्या पंक्तीचा विचार करु या

*आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्।*

शास्र कारांनी पशू आणि मानवाची ही लक्षणे सांगितली आहेत.

किंबहुना, यालाच सजीवाची लक्षणे म्हणायचे का ?

तर,हो !

हीच तर सजीवाची लक्षणे.

त्यातही ज्येष्ठता क्रम लावायचा झाला तर ?

तर,एक नंबरला असेन.

*”भय”*

संपूर्ण आयुष्यभर व्याप्ती असलेलं एकच एक सजीवाचं लक्षण

“आहार” पोट भरण्यासाठी असतो एकदा पोट भरले की,त्याची तीव्रता संपते.

अगदी वाघही पोट भरलेलं असतांना शिकार करीत नाही.

आहारातही भय आहेच.

“नाही पचले तर ?” चे

“वाटेत तर भूख लागणार नाही ?” चे

“भुखेच्या वेळे पोत्तर पोहोचू की नाही ?” चे

“झोपे”चंही तसंच काहीसं.

एकदा झोप झाली की,तिचेही अस्तित्व संपते किमान आठ दहा तासांसाठी तरी.

झोपेत तर हमखास भय आहे.

“झोप उडाली तर” चे

“झोप लागली तर ?” चे आणि हो !

“झोप लागलीच नाही तर ?” चे ही !

*”मैथुन”*

शरीर सुखाचा परमोच्च बिंदू गाठला की,त्याचीही आसक्ती संपते,निदान काही दिवसांसाठी तरी.

पण भय ?

ते तर तिथेही आहेच.

अगदी मैथुनातही भय आहेच आहे.

अनधिकृत असेन तर आहेच आहे

“कुणी बघेल का?” चे

“बघितले तर आणि कुणास सांगेल का ?” चे

पण, अधिकृत असेन तरी आहेच की,

“जेंडर काय असेन?” चे

“सर्व सुखरुप पार पडेन ना ?” चे

“रजा मिळेन ना ?” चे

“रजा पुरेन ना ?” चे

भयाचं तसे नाही,

त्याला वेळे काळाचं बंधन नाहीए.

भय हे अगदी बालपणापासून पाचवीला पूजलेलंच असतं म्हणाना !

“तो बघ बागुलबुवा आला”

ते

“पोलीस काका हा बघा त्रास देतोय, घेऊन जा याला …!” पर्यंत.

काही पहावे तरी भय आहेच

काही ही न पहावे तरी भय आहेच

काही लिहावे तरी भय आहेच की !

काय म्हणता,”लिहिण्यात कसले आलेय भय ?”

अहो! तिथंही भय आहेंच की, ह्या कॉपी पेस्ट च्या जमान्यात “कुणी आपलं नांव काढून स्वतःचे टाकले तर?” चे भय

किंवा

“नको ते आपल्या नांवे खपविण्याचे” भय

ह्या भया खातरच का संत महात्म्यांनी आरत्या लिहिल्या पण अखेरच्या पदी स्वतःचे नांव टाकण्यास ते विसरले नाहीत.

आजकाल पोस्ट खाली विनंती करावी लागते,

“पोस्ट आवडल्यास माझ्या नावासह शेअर करा” म्हणून.

त्यांना खात्री होती असं काही कुणी करणार नाही, म्हणूनच त्यांनी पोथी आणि स्तोत्रांचे शेवटी अगदी आरत्यांच्या अंतिम पंक्तीतही स्तोत्र कर्त्याचे नाव लीलया यमक साधून लिहिलेले असते.

म्हणजे हे वाडगम्य चौर्य कार्य आणि त्याचे भय अगदी पुरातन काळापासून चालत आलेले आहे तर !

शिवाय का

“इति श्री बुधकौशिक ऋषि……..”

किंवा

“इति श्री व्यास वीरचितं…….”

किंवा

“दास रामाचा वाट पाहे सदना”

किंवा

“नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा”

असतं.

थोडक्यात काय तर विंदा म्हणतात त्याप्रमाणे

*भय इथले संपत नाही*

हेच खरे !

 

——–राजा जोशी

9823687519

३० जानेवारी २०२३

प्रतिक्रिया व्यक्त करा