You are currently viewing करुळ घाटात ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला; चालक गंभीर..

करुळ घाटात ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला; चालक गंभीर..

पो.काँ. संदीप राठोड यांनी मोठ्या धाडसाने काढले चालकाला बाहेर; या देवदूताचे होतेय कौतुक

वैभववाडी
करुळ भट्टीवाडी नजिक एका धोकादायक वळणावर चालकाचा स्टेअरिंगवरील अचानक ताबा सुटल्याने मैद्याने भरलेला ट्रक करूळ घाटात अंदाजे २०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. तर चालकाचा ताबा सुटत असल्याचे लक्षात येताच क्लीनरने चालत्या गाडीतून उडी मारली आहे. दरम्यान या अपघातात वैभववाडी पोलीस संदीप राठोड हे देवदूत ठरले आहेत. राठोड तात्काळ घटनास्थळी पोहोचत त्यांनी जखमी चालकाला मोठ्या धाडसाने दरीतून बाहेर काढले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक दोनशे फूट दरीत गेल्याने ट्रकचा चक्काचूर झाला आहे. तर मैदा पिठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच करूळ चेक पोस्ट वरती ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घटनास्थळी पोहोचतात ते क्षणाचाही विलंब न करता दरीत उतरले. व गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाच्या अंगावर दगड होते. ते दगड पोलीस राठोड यांनी बाजूला केले. व दरीतून ट्रक चालकाला बाहेर काढले. मागील वर्षी ही श्री. राठोड यांनी दरीत अडकलेल्या ट्रक चालकाला मोठ्या शिताफीने बाहेर काढले होते. या अपघातातील ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी वैभववाडी पो. नि. अतुल जाधव घटनास्थळी दाखल झाले होते. गगनबावडा पोलीसांनाही या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही जखमींना बाहेर काढण्यास मदत केले. करूळ सह्याद्री जीव रक्षक टीमचे प्रमुख हेमंत पाटील आपल्या सहका-याना घेऊन अपघातस्थळी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − three =