You are currently viewing कणकवलीतील कनकनगर बंधाऱ्यातही पाणी अडविण्यास सुरवात…

कणकवलीतील कनकनगर बंधाऱ्यातही पाणी अडविण्यास सुरवात…

संजय कामतेकरांच्या मागणीला यश; नागरिकांच्या पाण्याची गैरसोय दूर होणार…

कणकवली

शहरातील गड नदीवर असलेल्या कनक नगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट लावून पाणी अडविण्याला सुरुवात झाली आहे. त्याबाबत ची मागणी नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर यांनी केली होती. तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क साधत तात्काळ हे पाणी अडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी केल्यानंतर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे कनक नगर येथील बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे या आसपासच्या भागातील जलस्त्रोतांमध्ये वाढ होऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होणार आहे. तसेच कणकवली शहरात उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये या दृष्टीने शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात सोडण्याची मागणी लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तसेच या बंधाऱ्याला प्लेट लावल्यामुळे हे पाणी अडवले जाऊन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या दूर होणार आहे. त्या अनुषंगाने देखील लवकरच कार्यवाही केली जाईल असे श्री. नलावडे यांनी सांगितले. तसेच श्री. कामतेकर यांनी या केलेल्या मागणीला यश आल्याबद्दल कनक नगर वासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 7 =