You are currently viewing बांदा-नेतर्डे रस्ता डागडुजीला सुरुवात 

बांदा-नेतर्डे रस्ता डागडुजीला सुरुवात 

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-नेतर्डे रस्त्याची मुदता संपण्यापूर्वीच दयनीय अशी दुरावस्था झाली होती. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा लेखी इशारा उपसरपंच जावेद ख़तीब यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास कार्यालयाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. यावेळी स्वतः उपसरपंच जावेद ख़तीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर यांनी उपस्थित राहत ठेकेदाराला सूचना दिल्या.

या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.प्रियांका नाईक व उपसरपंच जावेद ख़तिब यांनी महाराष्ट्र रस्ते विकासच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती. १५ दिवसांत खड्डे न बुजविल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला होता. यानुसार कनिष्ठ अभियंता राजाराम धर्णे यांनी तत्काळ दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा