You are currently viewing सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथे गव्यांच्या कळपाचे दर्शन

सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथे गव्यांच्या कळपाचे दर्शन

सावंतवाडी

येथील बाहेरचावाडा परिसरात आठ ते दहा गव्यांच्या कळपाने वाहनधारकांना दर्शन देत जुना मुंबई-गोवा महामार्ग पार केला. ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार तेथील युवक इर्शान बुरान याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. दरम्यान त्या ठिकाणी भरवस्तीत तसेच मुख्य रस्त्यावर येणार्‍या गव्यांपासून धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे या गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडुन करण्यात आली आहे.

शहरातील नरेंद्र डोंगर, माठेवाडा, झिरंगवाडी परिसरात गव्यांचा कळप राहतो. रात्री हा कळप फिरताना दिसतो. समोर माणसे दिसल्यानंतर हे गवे आक्रमक होताना दिसतात. त्यामुळे या गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडुन करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत वनविभागाचे अधिकारी मदन क्षीरसागर यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वनविभागाकडुन आवश्यक ती काळजी घेण्यता येत आहे. त्यासाठी त्यांना जंगलात पाणवठे तयार करण्यात आले आहेत. परंतु हा कळप परिसरात फिरताना दिसतो. मात्र ते आक्रमक होवू नये असा कोणताही प्रकार कोणी करू नये, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा