मालवण साबाचे कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या.

मालवण साबाचे कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या.

माळगाव साळकरवाडी येथील काजूच्या झाडाला लावला गळफास : पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद

मालवण

मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मयुरेश्वर चंद्रकांत भागानगरे (वय २४, राहणार सोलापूर) याने बुधवारी दुपारी माळगाव साळकरवाडी येथील काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मयुरेश्वर भागानगरे हे आज दुपारी माळगाव साळकरवाडी येथील सुरू असलेल्या साखवाच्या बांधकामावर सकाळी देखरेखीसाठी गेले होते. त्याठिकाणी कामावर कुणीही कामगार आला नव्हता याच दरम्यान भागानगरे यांनी रस्त्याच्या नजीक असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकताना आढळला ग्रामस्थांनी याबाबतची माहिती मसुरा पोलिसांना दिली.

मयुरेश्वर भागानगरे हे गेली दोन वर्षेमालवण सार्वजनिक बांधकाम कार्यालयात कार्यरत होते. दीर्घ आजाराने त्रस्त होते मुंबई येथे त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या निधनाची माहिती समजताच कनिष्ठ अभियंता नितीन दाणे, कनिष्ठ लिपिक भाऊ मायबा यांनी घटनास्थळी भेट दिली. भागानगरे यांच्या पाश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा