*भरतनाट्यम् या दाक्षिणात्य नृत्यकलेचा प्रसार सिंधुदुर्ग कन्या स्नेहल पार्सेकर करत आहेत, हे फार कौतुकास्पद आहे*.
मुंबईचे जिल्हाधिकारी तथा आयुक्त वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य मा. श्री राजीव निवतकर.
पुरातन काळापासून आपण आपली भारतीय संस्कृती जपत आलेलो आहेत. भरतनाट्यम् ही खरं तर दक्षिण भारतातील प्रसिद्ध शास्ञीय नृत्यकला. पण कोकणातील एक सामान्य कुटुंबातील मुलगी स्नेहल पार्सेकर ही या नृत्यकलेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन या नृत्यकलेचा प्रसार व प्रचार करत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे गौरवपर उदगार मुंबईचे जिल्हाधिकारी तथा आयुक्त वैद्यकीय शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य मा. राजीव निवतकर साहेब यांनी काढले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एम् आय् डि सी असोसिएशन व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाथ पै शिक्षण संकुलाच्या पटांगणावर वयम् स्टुडिओ, पुणे यांचा नृत्यांगना स्नेहल पार्सेकर हिने संरचित केलेला नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम सादर झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशा निवतकर मॅडम पण उपस्थित होत्या. मा. निवतकर साहेब यांनी यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश गाळवणकर हे समाजपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवून या जिल्ह्यात सकारात्मक सामाजिक चळवळ वृद्धींगत करत आहेत याबाबत मला त्यांचा आणि शाश्वत विकासासाठी धडपडणाऱ्या मोहन होडावडेकर यांचा सार्थ अभिमान आहे.
यावेळी सौ. आशा मॅडम व मा. निवतकर साहेब यांच्या शुभहस्ते वयम् स्टुडिओच्या संचालिका स्नेहल पार्सेकर व सहभागी कलाकार बीना नायर, साईशा उकिडवे, पावनी सिंह व मेघा पिसे या सहकलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित श्रोत्यांनी या नृत्याविष्काराला भरभरून प्रतिसाद दिला. तसेच दोन्ही संस्थाच्या वतीने मा. निवतकर साहेब व सौ. आशा मॅडम, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दै. तरुण भारत रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक श्री शेखर सामंत, कुडाळचे तहसीलदार मा. पाठक साहेब, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे पोलीस अधिकारी श्री सुनील धनावडे, एम् आय् डि सी असोसिएशचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश गाळवणकर, श्री भगवान परब, रोटरी क्लबचे श्री अमीत वळंजू, असोसिएशनचे कार्यवाह अॅड नकुल पार्सेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाथ पै शिक्षण संस्थेच्या सिईओ सौ. गाळवणकर, सर्व कर्मचारी वर्ग तसेच असोसिएशनचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला श्री राजेंद्र केसरकर, माजी नगरसेवका सौ. उषाताई आठल्ये, संजीव कर्पे, डॉ. संजय सावंत, युनियन बँक सावंतवाडी शाखेचे शाखाधिकारी श्री आठल्ये, श्री मदन सामंत, राजन नाईक, श्री शशिकांत चव्हाण, डॉ, नितीन पावसकर, कुणाल वरसकर, श्री भगवान परब, सौ. सिध्दी बिरमोळे, संग्राम खानोलकर,युनियन बॅकेचे निवृत्त शाखाधिकारी श्री राणे आदि मान्यवर उपस्थित होते.