You are currently viewing अनलज्वाला ८/८/८

अनलज्वाला ८/८/८

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*अनलज्वाला ८/८/८*

मुलीविना तर घराला कधी नसते घरपण
मुलगी असते सुखशांतीचे सुंदर दर्पण

खुडू नये ती उमलती कळी वेलीवरची
नात्यांमधली वीण सुगंधी करते अर्पण

रांधत..वाढत, उष्टी काढत..जगता जगता..
घरातल्यांना जीव लावते तिचे समर्पण

कर्तव्याच्या पूर्तीसाठी झिजते काया
चूल पेटण्या आयुष्याचे करते सरपण

मुलगी शिकली, प्रगती केली किती तरीही
वखवखलेल्या ‘त्या ‘ नजरांचे असते दडपण

सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा