You are currently viewing व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

बांदा

श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर पईकाणे ग्रुपचे संचालक तथा अध्यक्ष अतुल पईकाणे, प्रमुख अतिथी म्हणून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. हेमंत पेडणेकर, उद्योजक भाऊ वळंजू, शशीकांत पित्रे, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वर्षभरात प्रशालेत घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांची बक्षीसे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
डॉ. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश हे कौतुकास्पद आहे. या यशात प्रशालेचे शिक्षक पालक व विद्यार्थी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाने स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, तरच उत्तरोत्तर यशाची शिखरे गाठता येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मनाली देसाई, सूत्रसंचालन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, सौ. रिना मोरजकर यांनी केले. अहवाल वाचन रसिका वाटवे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. दीक्षा नाईक यांनी तर आभार प्रदर्शन हेलन रोड्रिक्स यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशाळेच्या स्पर्धा प्रमुख सौ. स्नेहा नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा