You are currently viewing ह्यूमन राईटच्या नेत्र तपासणी शिबिराचा ४९ रुग्णांना लाभ

ह्यूमन राईटच्या नेत्र तपासणी शिबिराचा ४९ रुग्णांना लाभ

कणकवली

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यातील जि. प. शाळा सातरल कासरल या ठिकाणी आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ ४९ नेत्र रुग्णांनी घेतला.

या शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली, तसेच सातरल कासरल तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित सरपंच सौ.मेस्त्री, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचप्रमाणे ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर, तालुका अध्यक्षा सौ.संजना सदडेकर, सचिव मनोज वारे, उपाध्यक्ष सदाशिव राणे, निरीक्षक प्रवीण गायकवाड, तसेच निवृत्त नायब तहसीलदार तथा संघटनेचे जनसंपर्क अधिकारी साईनाथ गोसावी व शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, डॉक्टर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच आय हॉस्पिटल नेत्रालयचे डॉ.अशोक कदम, ऋषिकेश कोरडे.त्याचप्रमाणे स्पेक्टोमार्टचे मंगेश चव्हाण व सौ.चव्हाण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा