You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात बेकायदेशीर दगडाच्या खाणी विनापरवाना उत्खनन; घरांना तडे* *मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष

सावंतवाडी तालुक्यात बेकायदेशीर दगडाच्या खाणी विनापरवाना उत्खनन; घरांना तडे* *मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष

*सावंतवाडी तालुक्यात बेकायदेशीर दगडाच्या खाणी*

*विनापरवाना उत्खनन; घरांना तडे*

*मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष*

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, सोनुर्ली, इन्सुली या गावांमध्ये काळ्या दगडाच्या खाणी व क्रशर आणि हॉटमिक्स प्लँट बसविण्याची परवानगी व उत्खननाची परवानगी देण्यात आली. सदर परवानगी सोनुर्ली गावात सुमारे १६ वेत्ये गावात ८ काळ्या दगडाच्या खाणींना परवानगी देण्यात आलेली आहे. विनापरवाना उत्खनन वरील गावातील मोठया क्रेशर व हॉटमिक्स प्लँटही बसवलेले आहेत.

 

या गावामधुन या खाणीबाबत ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी होणारे जास्त स्फोट व आणि हादरे बसुन घराला जाणारे तडे गेलेले आहेत. आणि प्रदुषण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी करुन त्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी व खनिकर्म विभागांनी वेत्ये, इन्सुली, निगुडे या गावातील पर्यावरणाबाबत प्रदुषण महामंडळाला पत्र लिहीलेले आहे. त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील परमे ता. दोडामार्ग, सोनुर्ली, वेत्ये याबाबत संचालक मायनिंगसेप्टी गोवा येथेही पत्रव्यवहार केलेला आहे. या क्रेशर आणि कौरीमुळे होत असलेल्या त्रासांबाबत ग्रामस्थांनी सदर खाणीची व पाटबंधारे प्रकल्प क्रेशर बंदची मागणी केलेली होती. व तडे गेलेल्या घरांचे मुल्यांकन करुन त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही.

त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील सरंबळे या धरणाच्या लाभ क्षेत्रात वरील गावे येत आहेत. वेत्ये व सोनुर्ली, इन्सुली या गावातुन जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे कालव्यालगत काही अंतरावरती क्रेशर बसविण्यात आलेल्या आहेत. परमे हे दोडामार्ग तालुक्यातील इकोसेन्सीटीव्ह भागामध्ये येत आहेत,अश्या ग्रामस्थांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे इकोसेन्सीटीव्हमध्ये सरंबळ धरणाचा लाभ क्षेत्रातील गावामध्ये क्रेशर व काळ्या खाणीचे दगड उत्खननाकरीता परवानगी देणे योग्य नाही. त्यामुळे या क्रेशर व काळ्या दगडाच्या खाणी रद्द करण्यासाठी व त्यांचा परवाना नुतनीकरण किंवा उत्खननाची रॉयल्टी भरुन घेऊनच नवे परवानगी रद्द करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी करत आहोत. वरील गावामध्ये

परवानगी घेतलेल्या खाणींपेक्षा विनापरवाना खाणी मोठया प्रमाणात आहेत. त्याचबरोबर एक सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन दुसऱ्या सर्व्हे नंबर उत्खनन करत असल्याची माहिती कळत आहे. त्यामुळे या सर्व खाणींच्या चौकशी करण्यात यावी.

सदर काही खाणींमध्ये आपणाकडुन देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा ९० फुटाच्या खाली उत्खनन केले असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन मे.दिलीप बिल्डकोन यांच्या खाणीवर स्वतः तहसिलदार जावुन ९० फुटापेक्षा खोल उत्खनन झाल्याचा अहवाल सादर केलेला आहे. हे आपल्या परवागीचे उत्खनन आणि पर्यावरणाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. तसेच परवानगी पेक्षा जास्त खोल म्हणजेच २० फुटापेक्षा जास्त खोलीचे होल मारुन स्फोट केल्याने आजुबाजुच्या घरांना तडे जाऊन भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत ही कमी होऊन काही ठिकाणचे पाण्याचे प्रवाह बदलण्याने काही गावांमध्ये पाणीटंचाई, विहिरीचे पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्याचे नियमाचे उल्लंघन (अंडरग्राऊंड वॉटरअॅक्ट) हा ही पर्यावरणाचा भाग आहे. त्याचप्रमाणे एका गावात किती क्रेशर असव्यात अशा मोठया प्रमाणात क्रेशर असल्यामुळे त्या-त्या गावाच्या भुपुष्ठाच्या बेरिंग कॅपेसिटीचा विचार केला गेलेला नाही व लाभ क्षेत्रात व इकोसेन्सीटीव्ह भागामध्ये वनजमिनीलगत काही ठिकाणी काळया दगडाच्या खाणींचा परवानगी दिली गेल्याने वनपर्यावरण प्रदुषण यांच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याबाबत योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी व मला माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी. अन्यथा या दिलेल्या क्रेशरच्या परवानगीबाबत वनपर्यावरणाच्या उल्लंघन होलाबाबत हरितलवादाकडे, न्यायालयाकडे दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी. १) सरंबळे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांची नावे. २) आपल्या कार्यालयाकडुन काळ्या दगडाच्या खाणीला परवानगी दिली त्याची माहितीची यादी. ३) आपल्या खनिकर्म विभागाकडुन प्रदुषण व पर्यावरण विभाग मायनिंगसेप्टीगोवा यांना पाठविलेल्या पत्रांची झेरॉक्स पाठवत आहे. अश्या आशयाचे निवेदन मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. यावेळी मनसेचे आशिष सुभेदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा