*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री वर्षा भावे, जबलपूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रिटायरमेंट*
रिटायरमेंट नंतर नकोच,त्याच रडगाणं ।
प्रयत्न असावा हसत रहावे, नकोच नुसतं रडणं ।
नकोच नुसता कंटाळा, नकोच नुसतं बसणं।।
कधी म्हणावे स्त्रोत तर,कधी ऐकावी गाणी।
कधी करावं गीता वाचन,कधी घ्यावी शिकवणी ।।
कधी पहावी मालिका,कधी वाचावी कहाणी ।
कधी खेळावे खेळ,तर कधी म्हणावी गाणी ।।
मित्र असतात आपल्या सुख- दुःखाचे आधार।
बिना जीवन संगिनी , नाही जीवनाचा विचार।।
कधी लावा बायकोला घर कामात हातभार ।
तेव्हाच राहू आपण स्वस्थ,कधी न येई आजार।।
आजी आजोबांनी नातवंडांशी खेळावा भातुकली संसार ।
आनंदी – आनंद सहजीवन राहील मजेदार ।।
करत रहावे नाम स्मरण,लीन रहावे गुरूचरणात ।
राम नाम जप करत रहावे, आनंद येई जीवनात ।
*वर्षा भावे*
*जबलपूर मध्यप्रदेश*