कणकवली
शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचा 58 व्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावरून शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी गौरवउद्गार काढले आहेत. यावेळी व्यासपीठावरून उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना पारकर म्हणाले की, सतीश सावंत यांनी 57 वर्षांमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अनेक सन्मान जनक पद त्यांनी भूषवली आहेत. जिल्हा परिषद ,अध्यक्ष जिल्हा बँक अध्यक्ष, अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी यश या कणकवली तालुक्यातील या मतदारसंघांमध्ये मिळवल आहे. सामाजिक राजकीय, सहकार क्षेत्र त्यांनी या क्षेत्रामध्ये फार मोठं काम जिल्ह्यामध्ये विशेषता उभा केलेला आहे. शिवसेनेमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व सहभागी झालो आमच्यासारख्या या सर्व नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेने त्यांच्यावर जबाबदारी सुद्धा दिली. उद्धव ठाकरे विनायक राऊत वैभव नाईक यांनी कणकवली विधानसभा निवडणुकी मध्ये त्यांना उमेदवारी तिकीट सुद्धा दिलं. मागच्या वेळेला विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी 14 000 मत त्यावेळी मिळालेली होती. शिवसेनेतून सतीश सावंत उभे राहिले तेव्हा त्यांना 56 हजार मतं पडली.
अशा प्रकारचा ताकतीचा नेता ,सामाजिक कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिवसेनेच्या वैभवामध्ये भर पडली. आम्ही सर्वांनी शिवसेनेच्या नेत्यांनी सांघिक काम उभं केलेल आहे. खूप आपल्यासमोर अडचणी आहेत . आज सतीश सावत यांचा वाढदिवस आणि कालच त्यांना प्रसंगाच्या समोर जावं लागलं आपल्या सामान्य कार्यकर्त्यावर हल्ला झाला आणि आपण जशास जसे उत्तर दिलं. या सर्व प्रकरणांमध्ये कुठेतरी शांतता भंग होते इथलं जे चांगलं वातावरण आहे ते राजकीय अपप्रवृत्ती करताना दिसत आहे. या अपप्रवृत्तीला नुसतं सहन करून चालणार नाही अप प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल ही लढाई सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये झाली.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ त्या नेत्याचं अस्तित्व आपण संपवलेला आहे. आणि कालच्या प्रकारानंतर उरलं सोडलेलं ते सुद्धा अस्तित्व संपून जाणार आहे. लोकांना गुंडगिरी नको आहे ,लोकांना विकास पाहिजे. जिल्हा शांतमय व्हावा आणि या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक रोजगार कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांमध्ये शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढली .आणि कोकणामध्ये रुजली. उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेतृत्व आहे आणि संयमी नेतृत्व आहे म्हणूनच लोकांची लोकप्रियता आणि सहानुभूती उद्धवजी ठाकरे यांना मिळत आहे.
सध्याचा आपला कठीण काळ आहे आणि या कठीण काळामध्ये सतीश सावंत यांना चांगलं यश मिळून दे सतीश सावंत यांना जर चांगले दिवस आले तर आम्हा सर्वांना चांगले दिवस येणार आहेत . भविष्य उज्वल आहे .त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकसंघ आहोत. आणि येणाऱ्या सर्व आव्हानांना आम्ही चोखपणे उत्तर देऊ असे गौरव उद्गार संदेश पारकर यांनी काढले