दोडामार्ग
नवोदय विद्यालयाच्या सीबीएससी परीक्षेत देशात सातवा क्रमांक पटकावून यश संपादन करणाऱ्या हेवाळे येथील अनुजा मनोहर देसाई व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये निवड झालेल्या हेवाळे येथील राहुल प्रवीण सावंत या दोघांचाही खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अनुजा देसाई हिचा सत्कार तिची आई मंजिरी मनोहर देसाई हिने स्वीकारला तर राहुल सावंत याचा सत्कार त्याचे वडील प्रवीण सावंत यांनी स्वीकारला.
यावेळी शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे,महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, युवा तालुका संघटक संदेश राणे,अल्विन लोबाे, तसेच शिवसेना युवा सेना महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.