You are currently viewing वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव आणि पुरस्कार वितरण समारंभ

वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव आणि पुरस्कार वितरण समारंभ

कवयित्री पल्लवी उमरे काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित

पुणे :

विश्वरत्न इंग्लिश मिडिअम स्कूल, विष्णूपंत ताम्हणे विद्यालय चिखली पुणे यांचे तर्फे काव्यगौरव पुरस्कार माझ्या ‘कॅनव्हास’ या काव्यसंग्रहाला जाहिर झाला होता. वादळवारा काव्यमहोत्सवात ८ जून रविवारी एस एम जोशी सभागृह पुणे येथे श्रीपाल सबनीस सरांच्या हस्ते सन्मान सुंदर ट्रॉफी, शेला आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ.श्रीपाल सबनीस सर, जेष्ठ साहित्यिक कथाकार बबन पोतदार सर,प्रमुख पाहुणे वि. दा. पिंगळे हनुमंत धालगडे, मा.व्यंकटराव वाघमोडे, डाॅ.शैलेंद्र भणगे, मा. सिताराम नरकेजी आदी मान्यवर उपस्थित होते. सबनीस सरांना ऐकणे म्हणजे पर्वणीच असते. मान्यवरांची भाषणे नवीन उर्जा देऊन गेली. यानिमित्ताने वैशाखी वादळवारा कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या. रानकवी जगदीप वनशीव यांनी सुंदर सुत्रसंचालन केले.लिहित्या हातांना बळ देणारे आणि स्वखर्चाने संमेलन आयोजित करून पुस्तकांना पुरस्कार देणारे ग्रामीण कवी श्री.चंद्रकांत जोगदंड सरांचे खूप खूप आभार आणि कौतुक. खरच आपली निस्वार्थ साहित्य सेवा आणि प्रेम वाखाणण्याजोगे आहे. माननीय चंद्रकांत जोगदंड सर, परिक्षक आणि सर्व मान्यवरांचे आभार, सर्व पुरस्कारार्थींचे मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..!

©® पल्लवी उमरे

प्रतिक्रिया व्यक्त करा